नवी मुंबई :-दहा हजाराची वर्गणी नाकारल्याने बार चालकाला मारहाण झाल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे येथील समुद्र बार च्या बाहेर हा प्रकार घडला आहे. बार चालक प्रेमानंद अल्वा (51) यांच्या तक्रारीवरून आदित्य बाकर, रितुराज पाटील,सुमित बाकर, आणि आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
15 तारखेला त्त्यांचा अल्वा यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर 16 तारखेला रात्री संबंधितानी आपल्याला बार च्या बाहेर बोलावून मारहाण केल्याचा त्त्यांचा आरोप आहे. तर मारहाणी मागे 10 हजाराची वर्गणी नाकारल्याने मारहाण केल्याचा आरोप बारमालकाने केला आहे.