नवी मुंबई :-अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या कारवाईत अमीन शेख (18) राहुल शहा (20) सुरज म्हात्रे (34) व गोरख म्हात्रे (38) या चौकडीवर रबाळे पोलिसांनी कारवाई केली. त्त्यांच्याकडून 40 हजाराचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. घणसोली सेक्टर -15 येथे नशेचा अड्डा बनविला होता.
घणसोली सेक्टर -15 येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. आडोशाला, रिक्षा मध्ये बसून दिवस रात्र अमली पदार्थाची नशा केली जात आहे. त्त्यांच्याकडून परिसरात चोऱ्या केल्या जात असल्याचा आरोप सुद्धा होत आहे. तर दिवस रात्र नशेमध्ये असणाऱ्या गुन्हेगारा मुळे परिसरातून ये जा करणाऱ्याच्याही सुरेक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. येथील गर्दूल्यांच्या अड्यांची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यावरून एका भूखंडाच्या उभारलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलिसांनी छापा टाकला. व कारवाई केली.