परभणी येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath suryavanshi) या तरुणाचा मृत्यू झाला. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी विधानसभेत खोटं वक्तव्य केलं, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. सोमनाथच्या मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
